श्री गणेशाच्या कृपेने मंडळाची स्थापना सन २००० साली झाली. गोटेवाडी गावातील रजिस्टर गणेशोत्सव मंडळ म्हणून आपल्या ओमकार गणेश मित्र मंडळ, गोटेवाडी–शेडगेवार्ड या मंडळाची नोंद आहे. मंडळाच्या स्थापनेवेळेस मंडळातील जेष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.गोटेवाडी गावामध्ये सर्वात शेवटचे व लहान मंडळ म्हणून ओमकार गणेश मित्र मंडळ शेडगेवार्ड या मंडळास ओळखले जात होते. पाहता पाहता मंडळास 25 वर्षे पूर्ण झालीत. हे पंचवीसावे वर्षे आम्ही साजरे करत असताना आपणास आम्ही कळवू इच्छितो की, मंडळाचे कार्य हे
“इवलेसे रोप लावियेले द्वारी”
“त्याचा वेलू गेला गगनावरी.”
या काव्याप्रमाने असुन गेली २५ वर्षांचा प्रवास म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांची अखंड मेहनत,चिकाटी आणि स्वप्नपूर्तीची एक कहाणीच आहे.संघर्षांना सामोरे जाऊन घडिवलेले यश, गेली २५ वर्षे म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करताना आलेल्या अडचणींवर मात करणे,नवनवीन संकल्पना घेऊन नवीन यशाची शिखरे गाठणे, नव नवीन यशाची पायरी गाठणे याप्रमाने गेलेत.
असे म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान याप्रमाणेच मंडळामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या ईतपतच मोजकेच कार्यकर्ते असून देखील मंडळाचे कार्य हे उत्तम नियोजनावर आजवर उल्लेखनीय प्रकारे चालू आहे.
मंडळाचे डेकोरेशन हे पंचक्रोशी मध्ये नावलौकिक आहे.या डेकोरेशनच्या माध्यमातून प्रतिवर्षी समाजाकरता एक सामाजिक संदेश देणारे अगदीच कमी खर्चामध्ये डेकोरेशन केले जाते.यामध्ये आजवर शेतकऱ्याचे आत्महत्या थांबवणेबाबत जनजागृती करणे, बळीराजा व त्याच्या कार्याला बळकटी देण्याकरिता बैलगाडी देखावा,मुखे प्राण्याचे जीवन -हाती देखावा, वृक्षारोपण काळाची गरज,प्रदूषण टाळा व विजेची बचत करा. श्रीकृष्ण जन्म कथा - वासुदेव प्रकृती आणि अष्टविनायक दर्शन इत्यादी डेकोरेशनचे उत्तम प्रकारे सादरीकरण मंडळाने आजवर केलेले आहे.
मंडळाचे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये छोटे गणपती बसविले जात होते परंतु मंडळाच्या स्थापनेच्या वर्षापासून कमी कार्यकर्त्याच्या अभावी घरातील सर्वांचे गणपती बसवणे बंद करून व एकाच ठिकाणी सार्वजनिक मंडळातील गणपती बसवून त्याची सेवा केली जाते.
गणपती मंडळ स्थापनेपासून मंडळातील सर्वच महिलावर्ग व पुरुष यांना आजवर कोणत्याही कार्यामध्ये कमतरता न भासल्याने मंडळातील प्रत्येक कुटुंबामध्ये दोन ते तीन महिला व पुरुष प्रत्येक वर्षी गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत ११ दिवस उपवास धरत असतात.
असे म्हणतात ना एखाद्या पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे घरातील स्त्रीचा पाठिंबा असतो.याचप्रमाणे आपल्या मंडळाच्या उत्कृष्ट कार्यापाठीमागे मंडळातील सर्वच लहान व थोर मंडळातील महिला वर्गाचा तसेच माहेरवासीनी महिलांचाही नेहमीच पाठिंबा लाभलेला आहे. कारण मंडळाचे कार्य करत असताना प्रत्येक कार्यामध्ये तसेच गणपती मिरवणूक असो किंवा मंडळाचा कोणताही कार्यक्रम असो त्या वेळी पूर्ण विभागांमध्ये रांगोळी काढायची असो या महिला नेहमीच या कार्यासाठी अग्रेसर असतात.
मंडळाची गणेश विसर्जनाची मिरवणूक प्रतिवर्षी सांप्रदाय पद्धतीने केली जाते.यामध्ये आजवर भजनी मंडळ, शाही मिरवणूक, धनगरी ढोल, लेझीम पथक, शिवकालीन दांडपट्टा, झांज पथक इत्यादी प्रमाणे केली असून यामध्ये महिला व पुरुष वर्गाचा मोठा सहभाग असतो.
मंडळाने आजवर फक्त गणपती बसवणे व विसर्जन करणे एवढेच कार्य न करता आपण ही समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आजवर मंडळाच्या वतीने शाळेतील गरजू मुलांना वह्या वाटप, गरजू मुलांना एक वर्षासाठी पालकत्व स्वीकारणे, कोरोना कालावधीत अत्यावश्यक वस्तूचे किट वाटप, गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या व्यवस्थेकरिता बाक देणे, गावातील गरजू व्यक्तींना अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप, गावच्या वेशिवरती रस्त्याच्या दुथर्फी बाजूस वृक्षारोपण करणे,ग्रामस्थाकरिता अष्टविनायक तीर्थयात्रेचे उत्तम नियोजन करणे असे अनेक समाजोपयोगी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवलेले असते.
मंडळातील सर्वच कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणती ना कोणती कला व कौशल्य दडलेले आहे. त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी जे कौशल्य आहे. त्याला मंडळातील त्याचप्रमाणे कार्याचे नियोजन दिले जाते. याचा आजवर मंडळाला उत्तम प्रकारे परतावा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपली कला मंडळाच्या कार्या मध्ये दाखवत असतो त्यामुळे मंडळाचे कार्य अतिशय उत्तम प्रकारे पार पडले जाते.
समाजप्रती कार्यास नेहमीच अग्रेसर राहण्याच्या उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मंडळ काम करत आहे. या सर्व कार्याकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून देखील मंडळातील कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची वार्षिक वर्गणी देणेबाबत सक्ती केली जात नाही. किंबहुना कार्यकर्त्यास वर्गणी देण्याचे शक्य नाही झाले तरी चालेल परंतु प्रत्येक कार्यक्रमाला आपण सहभागी व्हावे हेच मंडळाकडून प्रत्येकास सांगितले जाते.
मंडळात 40% हून अधिक पाहुण्यांचा सहभाग आहे.यामध्ये मंडळातील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकाचा भाचा हे आपलेच मंडळ आहे समजुन मामाच्या गावी या मंडळाकरिता सदैव कार्यरत असतात यामध्ये मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमावेळी माहेरवासनी महिला देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
मंडळाच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांचे मार्गदर्शन व सल्ला तसेच लहान कार्यकर्त्यांचा देखील योजना व कल्पनांचा मंडळाच्या कार्यामध्ये विचारात घेतले जाते. याचा मंडळाला आजवर उत्तम प्रकारे फायदा झालेला आहे. या मंडळामध्ये सर्वांनाच मानसन्मान व आदरपूर्वक व आपुलकीची वागणूक दिली जाते.
मंडळातील सर्व कार्यकर्त्यांती श्री गणपतीवर दृढ श्रद्धा असून सर्वच कार्यकर्त्यांची एक इच्छाशक्ती होती की मंडळाच्या जागेवर भविष्यात छोटे का होईना परंतु गणपतीचे मंदिर बांधायचे या इच्छाशक्ती नुसार सन 2024 मध्ये मंडळाने इच्छापूर्ती गणेश मंदिर उभारण्याचे कार्य ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडले आहे.
गेली २५ वर्षे मंडळ गणेशोत्सवा बरोबरच सामाजिक कार्यामध्ये नवनवीन उपक्रम राबवत असताना यामध्ये ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील मंडळावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी आजवर मंडळास उत्तम प्रकारे सहकार्य केले आहे.
गेली २५ वर्ष मंडळ करत असलेल्या कार्यामध्ये गोटेवाडी गावातील नागरिकांचे व पंचक्रोशीतील हितचिंतकाचे आजवर सहकार्य लाभले त्याबद्दल आपणा सर्वांचे मंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद व आभारी आहोत. मंडळाच्या कार्यासाठी भविष्यातील आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करत आहोत.
या सर्व उल्लेखनीय बाबीमुळेच आपले ओमकार गणेश मित्र मंडळ गोटेवाडी, शेडगेवार्ड हे गणेश मंडळ पंचक्रोशीतच नव्हे तर कराड तालुक्यामध्ये एक आदर्शवत रजिस्टर असे श्री गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
भविष्यात मंडळाच्या वतीने सामाजोपयोगी कार्य असो किंवा आकर्षक देखावा तसेच गुलाल व डॉल्बी विरहित उत्तम प्रकारे मिरवणूक यामध्ये मंडळ उत्तम प्रकारे नियोजन करून लोकांना काहीतरी वेगळे दाखवण्याचे मंडळ नक्कीच प्रयत्न करेन......
🙏 धन्यवाद......! 🙏 आपले नम्र अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते ओमकार गणेश मित्र मंडळ गोटेवाडी, शेडगेवार्ड