इच्छापूर्ती गणेश मंदिर हे कराड तालुक्यात गोटेवाडी गावात शेडगेवार्ड मध्ये स्थापित आहे. सर्व गणेश भक्तांसाठी मंदिर दिवभर खुले असते. मूर्तीची पुज्या शेडगेवार्ड मधील गणेशभक्त्त मनोभावे करतात. सकाळ संध्याकाळी रोज आरती केली जाते. संकष्टीला मंदिरात प्रसाद भजनाचे आयोजन असते. संकष्टी दिवसी पंचकृषीतील गणेशभक्त्त दर्शनासाठी मंदिरात येतात.
गेली 25 वर्ष मंडळ करत असलेल्या कार्यामध्ये गोटेवाडी गावातील नागरिकांचे व पंचक्रोशीतील हितचिंतकाचे आजवर सहकार्य लाभले त्याबद्दल आपणा सर्वांचे मंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद व आभारी आहोत. मंडळाच्या कार्यासाठी भविष्यातील आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करत आहोत.
या सर्व उल्लेखनीय बाबीमुळेच आपले ओमकार गणेश मित्र मंडळ गोटेवाडी, शेडगेवार्ड हे गणेश मंडळ पंचक्रोशीतच नव्हे तर कराड तालुक्यामध्ये एक आदर्शवत रजिस्टर असे श्री गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
भविष्यात मंडळाच्या वतीने सामाजोपयोगी कार्य असो किंवा आकर्षक देखावा तसेच गुलाल व डॉल्बी विरहित उत्तम प्रकारे मिरवणूक यामध्ये मंडळ उत्तम प्रकारे नियोजन करून लोकांना काहीतरी वेगळे दाखवण्याचे मंडळ नक्कीच प्रयत्न करेन......