मंडळातील सर्व कार्यकर्त्यांती श्री गणपतीवर दृढ श्रद्धा असून सर्वच कार्यकर्त्यांची एक इच्छाशक्ती होती की मंडळाच्या जागेवर भविष्यात छोटे का होईना परंतु गणपतीचे मंदिर बांधायचे या इच्छाशक्ती नुसार म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल अगदी त्यापद्तीने सर्व प्रश्न मार्गी लागले मग तो जागेचा असो किंवा भांडवलाचा असो जसे काही प्रत्यक प्रश्नला देवानेच सात दिली. मंदिर होण्यापाठी जणू काही श्रींचीच इच्छा. मग वास्तुशास्त्रज्ञ करपे साहेब यांच्यमार्गदर्शना खाली मुहूर्त ठरला.
बांधकामाचा शुभारंभ वैशाख शु.२ अक्षय तृतीया शनिवार दि. २२/०४/२०२३ रोजी सकाळी ११ वा. या शुभमुहूर्तावर सातारा जिल्हा खासदार व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल मा. श्री. श्रीनिवास पाटीलसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . त्याप्रसंगी उपस्थित सातारा जिल्हा पदवीधर मतदान संघाचे
अध्यक्ष मा. श्री अभिजीत सोमदेसाहे,टाळगावचे माजी सरपंच मा.श्री अण्णासाहेब जाधव, मा. श्री उदय पाटीलसाहेब (आबा),मा. श्री दिपकदादा लोखंडे साहेब,
गोटेवाडी गावचे सरपंच मा.डॉ विलास आमलेसाहेब,गोटेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा. श्री अनिल जाधवसाहेब,गोटेवाडी विकास सेवा सोसायटीचे सदस्य श्री अजितदादा मोहीतेसाहेब, मा.श्री सखाराम काटेकरसाहेब, मा. श्री संजय तोडकरसाहेब,
गणेशवाडी गावचे सरपंच मा. श्री मानेसाहेब आणि गोटेवाडी गावचे नागरिक व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.