Skip to main content

इच्छापूर्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥

इच्छापूर्ती,

श्री गणेश मंदिर, गोटेवाडी

कराड तालुक्यातील गोटेवाडी येथे वसलेले इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि सेवाभावाचे पवित्र केंद्र आहे. दररोजची आरती, धार्मिक उपक्रम आणि सामाजिक सेवेद्वारे मंदिर अनेक वर्षांपासून भाविकांची मनोभावे सेवा करत आहे.

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर

श्री गणेशाच्या कृपेने मंडळाची स्थापना सन २००० साली झाली. गोटेवाडी गावातील रजिस्टर गणेशोत्सव मंडळ म्हणून आपल्या ओमकार गणेश मित्र मंडळ, गोटेवाडी–शेडगेवार्ड या मंडळाची नोंद आहे. मंडळाच्या स्थापनेवेळेस मंडळातील जेष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.गोटेवाडी गावामध्ये सर्वात शेवटचे व लहान मंडळ म्हणून ओमकार गणेश मित्र मंडळ शेडगेवार्ड या मंडळास ओळखले जात होते. पाहता पाहता मंडळास 25 वर्षे पूर्ण झालीत. हे पंचवीसावे वर्षे आम्ही साजरे करत असताना आपणास आम्ही कळवू इच्छितो की, मंडळाचे कार्य हे

या काव्याप्रमाने असुन गेली २५ वर्षांचा प्रवास म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांची अखंड मेहनत,चिकाटी आणि स्वप्नपूर्तीची एक कहाणीच आहे.संघर्षांना सामोरे जाऊन घडिवलेले यश, गेली २५ वर्षे म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करताना आलेल्या अडचणींवर मात करणे,नवनवीन संकल्पना घेऊन नवीन यशाची शिखरे गाठणे, नव नवीन यशाची पायरी गाठणे याप्रमाने गेलेत.

“इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी.”

श्रद्धा, सेवा आणि संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरा जपणारे प्रेरणादायी केंद्र आहे. विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांमुळे मंदिर हजारो भाविकांच्या विश्वासाचे स्थान बनले आहे.

ओंकार गणेश मित्र मंडळ 2023

🙏 दररोज पूजा व आरती

दररोज सकाळ-संध्याकाळ भक्तिभावाने पूजा, आरती व धार्मिक विधी आयोजित केले जातात.
ओंकार गणेश मित्र मंडळ 2018

🎉 गणेशोत्सव

दरवर्षी भव्य गणेशोत्सव, भजन, कीर्तन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
वृक्षारोपण २०२५

❤️ सामाजिक सेवा

वृक्षारोपण,अन्नदान आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग.

👨‍👩‍👧‍👦 भाविकांचा विश्वास

गोटेवाडी व परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि मनोकामना पूर्ण करणारे मंदिर.

🪔 धार्मिक परंपरा

भारतीय संस्कृती, धार्मिक मूल्ये आणि परंपरांचा वारसा जपत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन.

🤝 सेवाभाव

समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे आणि प्रत्येक उपक्रमात भाविकांचा सहभाग असलेले मंदिर.

क्षणांमध्ये जपलेला श्रद्धा आणि भक्तीचा प्रवास

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरातील धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम, भक्तिमय क्षण आणि विविध कार्यक्रमांची अविस्मरणीय छायाचित्रे येथे अनुभवता येतील. प्रत्येक छायाचित्र मंदिराच्या समृद्ध परंपरेची आणि भाविकांच्या श्रद्धेची साक्ष देते.

२५ वर्षांच्या सेवेतून विश्वास, परंपरा आणि समाजसेवेचा वारसा

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर व मंडळ गेली २५ वर्षे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. उत्कृष्ट नियोजन, समाजसेवा, धार्मिक परंपरा आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे मंडळाने हजारो भाविकांचा विश्वास संपादन केला आहे.

असे म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान याप्रमाणेच मंडळामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या ईतपतच मोजकेच कार्यकर्ते असून देखील मंडळाचे कार्य हे उत्तम नियोजनावर आजवर उल्लेखनीय प्रकारे चालू आहे.

आपल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार

गेली २५ वर्ष मंडळ करत असलेल्या कार्यामध्ये गोटेवाडी गावातील नागरिकांचे व पंचक्रोशीतील हितचिंतकाचे आजवर सहकार्य लाभले त्याबद्दल आपणा सर्वांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार. भविष्यातील मंडळाच्या कार्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करत आहोत. मंडळ करत असलेल्या सामाजिक व उल्लेखनीय बाबीमुळेच ओमकार गणेश मित्र मंडळ गोटेवाडी, शेडगेवार्ड हे मंडळ पंचक्रोशीतच नव्हे तर कराड तालुक्यामध्ये एक आदर्श व नोंदणीकृत मंडळ म्हणून ओळखले जाते. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

मंडळ भविष्यात देखील समाजपयोगी व समाजापुढे आदर्श निर्माण होईल अशी कार्य करेल मग ते आकर्षक देखावा, पारंपरिक वाद्य सोबत घेऊन गुलाल विरहित रुबाबदार श्रींची विसर्जन मिरवणूक असो नेहमीच समाजहिताचे कार्य करण्याचा प्रयत्न मंडळाचा राहील…..

आपले नम्र : ओमकार गणेश मित्र मंडळ – शेडगेवार्ड, गोटेवाडी